Republic Day 2020 greetings (PC - Twitter)

Republic Day 2020: प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला ‘प्रजासत्ताक दिन’ (Republic Day) साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु, 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्य घटना अंमलात आली. त्यामुळे हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 26 जानेवारी 1950 पासून भारतातील प्रजेची सत्ता सुरू झाली. आज संपूर्ण देशात 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्ली राजपथावर भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडत असते.

या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. या दिवशी भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी मोठी मिरवणूकही काढली जाते. आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ,  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गज नेत्यांनी देशभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा - भारतीय प्रजासत्ताक दिन 2020: 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत गुगलने बनवले खास डूडल)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रजासत्ताक दिनी देशभरातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांनीही सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरून जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताने 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेची अंमलबजावणी केली. तेव्हापासून भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या घटनांची आठवण म्हणून देशात 26 जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे हा दिवस तमाम भारतीयांसाठी फार महत्त्वाचा असतो.