Teen Model Shot Dead by Ex-Boyfriend: अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे एक किशोरवयीन मॉडेल आणि ब्युटीशियनची हत्या करण्यात आली आहे. केल्वी लॅट्रिस मॅकक्रे (Kelvi Latrice McCray) नावाची ही 19 वर्षांची मॉडेल फेसटाइमवर तिच्या मित्रांशी गप्पा मारत असताना, तिच्या माजी प्रियकराने तिला गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला आदल्या दिवशी बंदुकीचा धाक दाखवून धमकावले होते. केइसन वुड्रो शॉ (Keisean Woodrow Shaw) नावाच्या तिच्या माजी प्रियकराने तिच्या डोक्यावर, मानेवर आणि पाठीवर गोळ्या झाडल्या. शॉवर फर्स्ट-डिग्री हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता पण दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.

मॅकक्रे रात्रीचे जेवण करत असताना आपल्या तीन मित्रांना फेसटाइमिंग करत होती. त्याचवेळी शॉ तिथे आला व त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. हा धक्कादायक प्रकार बघून केल्वीच्या मित्राने ताबडतोब 911 वर कॉल केला. मॅकक्रेने जानेवारीमध्ये त्यांचे एक वर्षाहून अधिक काळचे नाते संपुष्टात आणले होते, परंतु शॉने तिच्यासोबत राहणे सुरूच ठेवले. मॅकक्रेच्या पाम बीचच्या घरात दोघे एकत्र राहत होते. (हेही वाचा: Telangana Man Killed In Jet Ski Accident: अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय व्यक्तीचा जेट स्की अपघातात मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)