वाघोलीतील एका कुटुंबाला नाश्त्यात त्यांच्या सांबारमध्ये एक किडा आढळल्याची घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध इडली सेंटरमधील सांबारमध्ये हा मृत किडा आढळला आहे. या कुटुंबाने इथल्या अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. माहितीनुसार, सकाळच्या नाश्त्यासाठी त्यांनी या प्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्रेत्याकडून इडली आणि सांबार ऑर्डर केले. मात्र, जेव्हा त्यांनी सांबार खाण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना त्यात एक किडा असल्याचे आढळले. हा प्रकार पाहून संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.
कुटुंबाने तातडीने संबंधित विक्रेत्याशी संपर्क साधला, त्यावर, विक्रेत्यांनी ही बाब गांभीर्याने घेत असल्याचे आश्वासन दिले आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. या घटनेनंतर संबंधित कुटुंबाने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, अन्नाची स्वच्छता आणि दर्जा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण ज्या ठिकाणाहून अन्न विकत घेतो, तिथे स्वच्छता पाळली जाते का, याची खात्री करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. हा प्रकार उघड झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने या घटनेची चौकशी करून कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. (हेही वाचा: Washing Vegetables In Sewer Water: उल्हासनगरच्या खेमाणी मार्केटमध्ये विक्रेत्याने नाल्याच्या पाण्यात धुतल्या भाज्या; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी व्यक्त केला संताप)
A family from Wagholi had an unpleasant surprise when they discovered an insect in their breakfast sambar from a popular idli outlet. Shocked by the incident, they contacted customer care, who assured them that the issue would be addressed. The family is now raising awareness to… pic.twitter.com/dtmjBiFlXK
— Pune Mirror (@ThePuneMirror) March 18, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)