Woman Thrown Off Building: पाकिस्तानातील लाहोरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, या ठिकाणी चिकन व्यवस्थित न बनवल्याने एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी घराच्या वरच्या मजल्यावरून फेकून दिल्याची भीषण घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला इमारतीवरून पडताना दिसत असून ती पडताना तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येतो.

लाहोरच्या नोनारियन चौकातील शालीमार रोडजवळ 9 मार्च रोजी ही घटना घडली. घटनेनंतर मरियम नावाच्या पीडितेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर दुखापतीनंतर तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेतील मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी महिलेचा पती, सासू शाजिया आणि तिचा दीर रोमन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त असून, पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Fake Coca Cola: सावधान! कोको कोला भेसळयुक्त असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल)

व्हिडिओ (यातील दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात)-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)