Frozen Chicken Products Recalled: संभाव्य लिस्टेरिया दूषिततेमुळे यूएसमध्ये 2,000 पौंडांपेक्षा जास्त फ्रोजन चिकन उत्पादने परत मागवण्यात आली आहेत. यूएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चरने (USDA) दिलेल्या माहितीनुसार, कॅनडामधील निर्यातदार अल साफा यूएस एलएलसी यांनी 2,010 पौंड रेडी-टू-इट चिकन उत्पादने परत मागवली आहेत. अहवालानुसार, अशा चिकनमध्ये लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्ससह भेसळ असण्याची भीती व्यक्त केली आहे. प्रभावित उत्पादने कॅनडामध्ये 5 जून रोजी तयार करण्यात आली होती आणि 13 जून आणि 21 जून रोजी यूएसमध्ये आयात करण्यात आली होती.
फेडरल एजन्सीने उघड केले की, यूएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चरच्या अन्न सुरक्षा आणि तपासणी सेवेला नियमित उत्पादन चाचणी दरम्यान या चिकनमध्ये समस्या आढळली, त्यानंतर निर्यातदाराने हे चिकन परत मागवले. लिस्टेरिओसिसला कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियामुळे उत्पादन दूषित झाले असावे असे चाचणी निकालांनी सूचित केले. लिस्टिरिओसिस हा एक गंभीर संसर्ग आहे, जो प्रामुख्याने वृद्ध प्रौढ, कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या व्यक्ती आणि गर्भवती महिला आणि त्यांच्या नवजात बालकांना प्रभावित करतो. (हेही वाचा: Brain-Eating Amoeba Cases In Kerala: केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या दुर्मिळ अमिबा संसर्गाची चौथी घटना; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिल्या विशेष सूचना)
पहा पोस्ट-
More than 2,000 pounds of frozen #chicken products have been recalled nationwide in the US over potential Listeria contamination.https://t.co/n53sfXshdq
— Hindustan Times (@htTweets) July 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)