Fake Coca Cola: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात पंजाब पाकिस्तानमधील पुरुष भेसळयुक्त कोल्ड्रिंकमध्ये कोका कोलाच्या बाटल्या भरताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकप्रिय कोल्ड्रिंगबाबत असा खुलासा झाल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रिकाम्या बाटल्यांमध्ये भेसळयुक्त पेय कोका कोला भरताना दिसत आहे. या धक्कादायक घटनेमुळे सुरक्षतेवर आणि गुणवत्ता नियंत्रण उपायांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेटकऱ्यांनी कंमेटमध्ये या संदर्भाची सखोल माहिती तपासली जावी याची मागणी केली आहे.(हेही वाचा- फूड कॉम्बिनेशनचा नवा प्रयोग, बाजारात आला ' गुलाबजाम वडा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)