Hindu Temple Vandalised: कॅनडात भारतविरोधी भित्तिचित्रांसह हेरिटेज हिंदू मंदिराची विटंबना, भारतीय वाणिज्य दूतावासाकडून निषेध व्यक्त
गौरी शंकर मंदिरातील तोडफोडीच्या कृत्याचा निषेध करताना टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, मंदिराची विटंबना केल्याने कॅनडातील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
कॅनडातील ब्रॅम्प्टनमधील एका प्रख्यात हिंदू मंदिराला भारतविरोधी भित्तिचित्रांनी लक्ष्य करण्यात आले असून त्यामुळे भारतीय समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. ब्रॅम्प्टन प्रांतात एका हिंदू मंदिराची 'भारतविरोधी' ग्राफिटीने तोडफोड केल्याने भारतीय समुदायाला धक्का बसला. टोरोंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने मंगळवारी एक निवेदन जारी करून ब्रॅम्प्टनमधील गौरी शंकर मंदिरावरील हल्ल्याचा निषेध केला. गौरी शंकर मंदिरातील तोडफोडीच्या कृत्याचा निषेध करताना टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, मंदिराची विटंबना केल्याने कॅनडातील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हेही वाचा Peshawar Suicide Blast: पाकिस्तानातील पेशावर येथे आत्मघातकी हल्ला; मृतांची संख्या 83 वर
A Hindu temple vandalised with 'anti-India' graffiti in #Canada's Brampton province, leaving the Indian community in shock.
The Indian Consulate General in Toronto issued a statement on Tuesday condemning the attack on the Gauri Shankar Mandir in Brampton. pic.twitter.com/dwClul3POt
— IANS (@ians_india) January 31, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2023 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

