ब्रिटनचे नवे राजे किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी राणी कॅमिला यांच्यावर अंडी फेकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बुधवारी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. यॉर्कमध्ये एका पारंपारिक समारंभासाठी आलेल्या ब्रिटीश राजा आणि त्यांच्या पत्नीवर अंडी फेकण्यात आली. राजा आणि राणी हे यॉर्क, यॉर्कशायरच्या आसपास फिरत होते तेव्हा त्यांच्यावर 3 अंडी फेकली गेली, परंतु सुदैवाने अंडी फेकणाऱ्या व्यक्तीचा नेम चुकला. यावेळी गर्दीमध्ये, ‘हा देश गुलामांच्या रक्तावर उभा राहिला आहे,’ असे वाक्य ऐकू आले. त्यानंतर गणवेशधारी पोलिसांनी संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले. आपली आई, राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर सप्टेंबरमध्ये सिंहासनावर बसलेले चार्ल्स सध्या उत्तर इंग्लंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)