ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंट दिवसेंदिवस सोपे होत आहे. यापूर्वी युपीआय पेमेंटची सुविधा क्रेडिट कार्डद्वारे उपलब्ध झाली होती. आता मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे युपीआय पेमेंटची व्याप्ती वाढवली आहे. व्हॉट्सअॅप भारतीय ग्राहकांना एक नवीन सुविधा देणार आहे. लवकरच चॅट्स व्यतिरिक्त, व्हॉट्सअॅपवर युपीआय पेमेंटदेखील केले जाऊ शकते. तुम्ही लवकरच व्हॉट्सअॅपवर युपीआय अॅप्स, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे पेमेंट करू शकता. मेटाच्या मेसेजिंग कंपनीने Razorpay आणि PayU सोबत भागीदारी केली आहे. त्यांच्यासोबत भागीदारी म्हणजे मेसेजिंग अॅपमध्ये अनेक पेमेंट पर्याय जोडले गेले आहेत. अशाप्रकारे व्हॉट्सअॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर खरेदीची सोय वाढवली आहे. व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाने बुधवारी आपल्या वापरकर्त्यांसाठी पेमेंट सेवा सुलभ करण्यात येत असल्याची घोषणा केली. (हेही वाचा: 'CMO Maharashtra' WhatsApp Channel: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी थेट व्हॉट्सॲपद्वारे कनेक्ट; 'सीएमओ महाराष्ट्र’ या चॅनेलची सुरुवात, जाणून घ्या कसे कराल फॉलो)
Chatting with businesses on @whatsapp is about to get even better 🙌:
✅ Quickly choose your train seat or order food without leaving your chat
✅ Complete a purchase directly in your chat using UPI apps, debit and credit cards, and morehttps://t.co/TtqlPe4qCs
— Meta Newsroom (@MetaNewsroom) September 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)