चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आणि तेथून अभ्यास करण्यासाठी भारताने आखलेले चांद्रयान 3 हे अखेर यशस्वीरित्या प्रक्षेपित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 42 दिवसांचा प्रवास करून हे यान चंद्रावर पोहचेल असा अंदाज आहे. जर या चंद्रयानातून चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यशस्वी लॅन्डिंग झाल्यास हा विक्रम करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. पृथ्वीच्या कक्षातून चंद्राच्या कक्षात जाण्याचा प्रवास हा कठीण आहे. त्याकडे आता वैज्ञानिकांचे लक्ष असणार आहे. चंद्रावर यान LVM3 M4 सध्या ऑर्बिट मध्ये यशस्वीरित्या लॉन्च झाल्याची माहिती इस्त्रो ने दिल्यानंतर हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हणत भारताचं कौतुक केले आहे. इथे पहा हा अभिमानास्पद क्षण!
पहा इस्त्रो चं ट्वीट
LVM3 M4/Chandrayaan-3 Mission:
LVM3 M4 vehicle🚀 successfully launched Chandrayaan-3🛰️ into orbit.
— ISRO (@isro) July 14, 2023
इस्त्रो च्या वैज्ञानिकांनी व्यक्त केला आनंद
#WATCH | #Chandrayaan3 project director P Veeramuthuvel and ISRO chief S Somanath share their delight after the LVM3 M4 vehicle successfully launched it into orbit.
"Chandrayaan-3, in its precise orbit, has begun its journey to the Moon. Health of the Spacecraft is normal," says… pic.twitter.com/nL52Ue5e7D
— ANI (@ANI) July 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)