ISRO कडून उद्या 2 सप्टेंबर दिवशी Aditya-L1 Mission श्रीहरीकोटा येथून अवकाशामध्ये झेपावणार आहे. चंद्रयान 3 नंतर इस्त्रो कडून आता सूर्या भोवतीचा अभ्यास करण्यासाठी हे नवं मिशन हाती घेण्यात आलं आहे. PSLV-XL रॉकेट च्या मदतीने उद्या सकाळी 11.50 च्या सुमारास आदित्य एल 1 अवकाशात झेपावेल. आदित्य-एल1 हे हॅलो ऑर्बिटमध्ये समाविष्ट केले जाईल. जेथे L1 बिंदू आहे. हा बिंदू सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे. पण सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत ते फक्त 1 टक्के आहे. या प्रवासात 127 दिवस लागणार आहेत. हे अवघड मानले जाते कारण त्याला दोन मोठ्या कक्षेत जावे लागते. Aditya L1 Mission: आदित्य एल1 सुर्यावर कसला शोध घेणार?
#WATCH | Preparations underway at Sriharikota for Aditya-L1 Mission launch by Indian Space Research Organisation (ISRO)
Aditya-L1 launch is scheduled for tomorrow, 2nd September. pic.twitter.com/Q1voY7DUk4
— ANI (@ANI) September 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)