भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोविडच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गांगुली पुढील दोन आठवडे होम आयसोलेशनमध्ये राहणार आहे. आम्ही गांगुलीला आज दुपारी डिस्चार्ज दिला आहे. त्याला पुढील पंधरवड्यापर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. त्यानंतर पुढील उपचारांचा मार्ग ठरवला जाईल, असे रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
West Bengal | BCCI Chief Sourav Ganguly discharged from Woodlands Multispeciality Hospital, Kolkata after recovering from COVID19 pic.twitter.com/5h0wUtk4sy
— ANI (@ANI) December 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)