Usman Khawaja’s Mother Hug David Warner: ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SGC) पाकिस्तानविरुद्ध (AUS vs PAK) त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी आला होता. ही कसोटी मालिका वॉर्नरसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने संपली. वॉर्नर शेवटच्या वेळी फलंदाजीला आला तेव्हा त्याला पाकिस्तान क्रिकेट संघाकडून गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. वॉर्नरला एसजीसीमध्ये उपस्थित सर्वांकडून स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले. सामना संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने उस्मान ख्वाजाच्या (Usman Khawaja) आईला मिठी मारली, हा क्षण खूप भावनिक होता. वॉर्नर आणि ख्वाजा वयाच्या सहाव्या वर्षापासून मित्र आहेत. (हे देखील वाचा: Ambati Rayudu Quits YSRCP: माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू 10 दिवसात राजकीय खेळपट्टीवरून 'आऊट'; जगन रेड्डी यांच्या पक्षात सामील झाल्यानंतर 8 दिवसांनी दिली सोडचिठ्ठी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)