Ambati Rayudu Quits YSRCP: माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू 10 दिवसात राजकीय खेळपट्टीवरून 'आऊट'; जगन रेड्डी यांच्या पक्षात सामील झाल्यानंतर 8 दिवसांनी दिली सोडचिठ्ठी
Ambati Rayudu Quits YSRCP (PC - X/@nabilajamal_)

Ambati Rayudu Quits YSRCP: माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू (Ambati Rayudu) ने शनिवारी युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP) सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या पक्षात सामील झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेड्डीरेड्डी मिथुन रेड्डी यांच्यासह जगन मोहन रेड्डी यांनी माजी क्रिकेटपटूचे पक्षात स्वागत केले होते. परंतु, रायडूने सोशल मीडियावर पक्ष सोडल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

रायडूने आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की मी YSRCP पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मी काही काळ राजकारणापासून दूर राहणार आहे. भविष्यात मी जो काही निर्णय घेईन, त्याची माहिती सर्वांना देईन.' (हेही वाचा - Ambati Rayudu New Record: अंबाती रायडूने आयपीएलमध्ये केली कमाल, या दिग्गजांच्या विशेष क्लबमध्ये झाला सामील)

 

दरम्यान, अंबाती रायडूने या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. टीम इंडिया व्यतिरिक्त, तो बर्याच काळापासून वेगवेगळ्या आयपीएल संघांसाठी खेळला आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. मात्र, निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्याने आपला निर्णय बदलला आहे.