Ambati Rayudu New Record: अंबाती रायडूने आयपीएलमध्ये केली कमाल, या दिग्गजांच्या विशेष क्लबमध्ये झाला सामील
या सामन्यात अंबाती रायडूने (Ambati Rayudu) एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. मैदानावर पाऊल ठेवताच आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा तो नववा क्रिकेटपटू ठरला आहे.
आयपीएल 2023 चा (IPL 2023) 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात अंबाती रायडूने (Ambati Rayudu) एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. मैदानावर पाऊल ठेवताच आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा तो नववा क्रिकेटपटू ठरला आहे. 200 आयपीएल सामने खेळल्यामुळे, तो महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. (हे देखील वाचा: WTC Final मध्ये Rohit Sharma करु शकतो ऑस्ट्रेलियाची धुलाई, इंग्लंडमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर)
आयपीएलमध्ये 200 सामने खेळलेल्या खेळाडूंची यादी
महेंद्रसिंग धोनी - 246
दिनेश कार्तिक - 240
रोहित शर्मा - 238
विराट कोहली - 234
रवींद्र जडेजा - 222
शिखर धवन - 214
सुरेश रैना - 205
रॉबिन उथप्पा - 205
अंबाती रायुडू - 200
अंबाती रायुडूची आयपीएल कारकीर्द
अंबाती रायडू 37 वर्षांचा आहे. त्याने 200 सामन्यांमध्ये 4303 धावा केल्या आहेत. या लीगमध्ये त्याने 1 शतक आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 170 षटकार आणि 357 चौकार मारले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2023 11:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

