टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊमध्ये खेळला जात आहे. पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 99 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक नाबाद 20 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 100 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला चौथा मोठा धक्का बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर 10 धावा करून धावबाद झाला. टीम इंडियाचा स्कोर 70/4.
2ND T20I. WICKET! 14.3: Washington Sundar 10(9) Run Out Blair Tickner, India 70/4 https://t.co/p7C0QbPSJs #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)