विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. सर्व 9 लीग सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे, तर न्यूझीलंड पुन्हा एकदा टीम इंडियासमोर आपले आव्हान सादर करणार आहे. आजपर्यंत टीम इंडियाला उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात किवी संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. पण यावेळी टीम इंडियाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्ट राहिल्याने आज टीम इंडियाला हा विक्रम सुधारून अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने आपले शानदार अर्धशतर झळकावले आहे. भारताचा स्कोर 271/1
Shreyas 🔥-Iyer in 🔝 touch in Mumbai as he gets yet another FIFTY in #CWC23 💪#TeamIndia 267/1 in the 37th over 👌👌
What 🎯 are we looking at from here 🤔
Follow the match ▶️ https://t.co/FnuIu53xGu#MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/FFFwSAJFoG
— BCCI (@BCCI) November 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)