राशिद खानच्या बीबीएल फ्रँचायझी अॅडलेड स्ट्रायकर्सने गुरुवारी जाहीर केले की रशीदला "किरकोळ ऑपरेशन" आवश्यक आहे आणि आगामी बीबीएल हंगामातून त्याने माघार घेतली आहे. नंतर रशीदने शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलच्या बेडवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांना आश्वासन दिले की शस्त्रक्रिया चांगली झाली आणि तो बरा होण्याच्या मार्गावर आहे. राशिदने अलीकडेच आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तानसोबत यशस्वी मोहीम पूर्ण केली. (हे देखील वाचा: Sanju Samson On Rohit Sharma Support: रोहित शर्माबद्दल संजू सॅमसन म्हणाला मोठी गोष्ट, भारताच्या कर्णधारने दिला सर्वात जास्त पाठिंबा, पाहा व्हिडिओ)
Thank you everyone for your well wishes 🙏
The surgery went well, now on the road to recovery 💪
Can’t wait to be back on the field 💙 pic.twitter.com/zxLYKFaoYE
— Rashid Khan (@rashidkhan_19) November 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)