ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 34 धावांनी जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने शानदार शतक झळकावले (120*). ॲडलेडमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ग्लेन मॅक्सवेलचे वादळ पाहायला मिळाले. ग्लेन मॅक्सवेलने 55 चेंडूत 120 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 8 षटकार मारले. ग्लेन मॅक्सवेलचे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील हे पाचवे शतक आहे. ग्लेन मॅक्सवेलने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 8 षटकार मारले. ज्यामध्ये एक षटकार 109 मीटर इतका लांब होता, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या झंझावाती खेळीत ग्लेन मॅक्सवेलने 55 चेंडूत 218 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळले आणि 8 मोठे षटकार ठोकले, त्यापैकी एक 109 मीटरचा होता. या खेळीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने 241 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली होती.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)