Brisbane Heat Won BBL 2023-24: ब्रिस्बेन हीटने बिग बॅश लीगच्या 13व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले, दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली
सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात सिडनी सिक्सर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हीट संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 166 धावा केल्या.
Brisbane Heat Won BBL 2023-24: ब्रिस्बेन हीटने बिग बॅश लीगच्या 13व्या हंगामावर कब्जा केला आहे. अंतिम सामन्यात स्टार गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनने शानदार गोलंदाजी केली. जॉन्सनने 4 षटकात 26 धावा देत 4 बळी घेतले. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात सिडनी सिक्सर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हीट संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 166 धावा केल्या. सलामीवीर जोश ब्राऊनने संघाकडून सर्वात मोठी 53 धावांची खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सचा संघ 17.3 षटकांत सर्वबाद 112 धावांत आटोपला. अशाप्रकारे ब्रिस्बेन हीटने हा सामना 54 धावांनी जिंकला. यासह ब्रिस्बेन हीटने दुसऱ्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला.
Lift it high, Brisbane 🏆
You’re the champions of #BBL13 👏 pic.twitter.com/jyMLcigHS3
— KFC Big Bash League (@BBL) January 24, 2024
They brought the HEAT 🏆
Brisbane are #BBL13 champions! pic.twitter.com/QDrTMY01w8
— KFC Big Bash League (@BBL) January 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 24, 2024 07:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

