IPL 2025: माजी दिग्गज फलंदाज, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2025) पुनरागमन केले आहे. टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनवल्यानंतर राहुल द्रविडची आता आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत खळबळ उडाली होती आणि आता फ्रँचायझीनेच हे रहस्य उघड केले आहे. शुक्रवारी, 6 सप्टेंबर रोजी, राजस्थानने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे द्रविडची संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. याआधीही राहुल द्रविड राजस्थानशी जोडला गेला होता आणि 2014-2015 मध्ये सलग दोन हंगामात तो संघाचा मार्गदर्शक होता. राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेक लश मॅक्रम यांनी संघाची आयपीएल जर्सी देऊन राहुल द्रविडचे फ्रँचायझीमध्ये परतण्याचे स्वागत केले. विश्वचषकानंतर प्रशिक्षकपदावर परतण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असल्याचेही द्रविडने सांगितले.
Rahul Dravid, India's legendary World Cup-winning coach, is set for a sensational return to Rajasthan Royals! 🇮🇳🤝
The cricket icon was captured receiving his Pink jersey from the Royals Sports Group CEO Jake Lush McCrum. It is believed that the RR Admin was present too,… pic.twitter.com/C6Q8KRDFgW
— (@rajasthanroyals) September 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)