Mumbai Shocker: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीचा हत्या; आरोपीला अटक
आरोपी वसीम त्याची पत्नी गौशिया आणि दोन मुलांसह गोरेगाव पश्चिम येथे राहतो. वसीमला दारूचे व्यसन आहे. सोमवारी सकाळी वसीमने गौशियाकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, गौशियाने त्याला पैसे देण्यास नकार दिला.
Mumbai Shocker: मुंबईतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपाखाली एका पुरूषाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केलीय ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजता मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे घडली. या घटनेनंतर बांगूर नगर पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव वसीम रफिक शेख आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी वसीम त्याची पत्नी गौशिया आणि दोन मुलांसह गोरेगाव पश्चिम येथे राहतो. वसीमला दारूचे व्यसन आहे. सोमवारी सकाळी वसीमने गौशियाकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, गौशियाने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या वसीमने गौशियाशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की वसीमने त्याच्या दोन मुलांसमोर औशियाचा गळा दाबून खून केला. (हेही वाचा - Mumbai Aarey Colony Incident: आजारी वृद्ध महिलेला कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना, नातवावर गंभीर आरोप)
औशियाची हत्या केल्यानंतर वसीमने त्याच्या सासूला फोनवरून याबाबत माहिती दिली. तथापी, आरोपी पतीन आपला मोबाईल बंद करून घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. या प्रकरणात, औशियाच्या वडिलांनी बांगुर नगर पोलिसांकडे आरोपी वसीमविरुद्ध तक्रार दाखल केली. (हेही वाचा - Sangli Father Killed Daughter: धक्कादायक! NEET सराव परीक्षेत कमी गुण; मुख्याध्यापक बापाच्या मारहाणीमुळे मुलीचा मृत्यू)
आरोपी पतीला अटक -
दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. हत्येच्या दोन तासांतच पोलिसांनी वसीमला राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2025 12:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

