Sangli Father Killed Daughter: धक्कादायक! NEET सराव परीक्षेत कमी गुण; मुख्याध्यापक बापाच्या मारहाणीमुळे मुलीचा मृत्यू
Atpadi News: डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा संतापलेल्या बापाच्या मारहाणीत मृत्यू. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील घटना.
Nelkaranji News: आपण पाहिलेली स्वप्नं आपल्या मुलांनी पूर्ण करावीत, यासाठी पालकांचे हट्टाला पेटणे मुलाबाळांच्या जीवावर बेतू लागले आहे. अनेकदा अभ्यासातून आलेला ताण आणि परीक्षांमध्ये नापास होण्याची भीती किंवा आलेले अपयश, यामुळे आलेल्या नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचे पुढे आले आहे. पण, याहीपेक्षा धक्कादायक घटना सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी (Atpadi) तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील नेलकरंजी (Nelkaranji) येथील शाळेत मुख्याध्यापक असलेल्या एका बापाने नीट (NEET Exam) परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या कारणावरुन इतकी बेदम मारहाण केली की, ज्यामध्ये 17 वर्षीय मुलीचा चक्क मृत्यू (Father Killed Daughter) झाला आहे. हा सगळा प्रकार शुक्रवारी (20 जून) रात्री 9.30च्या सुमारास घडला. धोंडीराम भगवान भोसले असे मुख्याध्यापक वडिलाचे नाव आहे तर, साधाना धोंडीराम भोसले असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी धोंडीराम भोसले यास अटक केली आहे.
काय घडले नेमके?
धोंडीराम भगवान भोसले हा नेलकरंजी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक असून तो मुख्याध्यापक देखील आहे. त्याची मुलगी साधना (वय-17 वर्षे) साधना आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती. तिस डॉक्टर व्हायचे होते म्हणून ती नीट परीक्षेचा अभ्यास करत होती. दरम्यान, अद्याप नीटची परीक्षा तिन दिली नव्हती, पण त्या परीक्षेचा ती सराव करत होती. अशाच नीट सराव परीक्षेत तिला कमी गुण मिळाले, या कारणावरुन वडील धोंडीराम भोसले याने तिस जात्याच्या खुंट्याने बेदम मारहाण सुरु केली. अत्यंत वेदनेने ती कळवळत होती. त्यातच आतिव संतापातून तिने वडिलांना उलट उत्तर देत, तुम्हालाही कमी मार्क्स होते ना, तुम्ही तरी कोठे कलेक्टर झालात? असे म्हटले. त्यावरुन धोंडीराम आणखीच भडकला. त्याने तिस आणखीच त्वेशाने मारहाण केली. (हेही वाचा, Atpadi News: आटपाडी हादरली, जिम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार)
जखमी मुलीस पाठी सोडून शाळेत कार्यक्रमास हजेरी
धक्कादायक असे की, बेदम मारहाण केल्याने मुलगी साधना ही प्रचंड जखमी झाली. वेदनेने अत्यंत तडफडत असतानासुद्धा वडील धोंडीराम भगवान भोसले याने तिस तशाच अवस्थेत सोडले आणि योगदिनानिमित्त शाळेत कार्यक्रमास हजेरी लावली. भोसले पुढे शाळेत योगदिनाच्या कार्यक्रमास गेले असताना पाठिमागे साधनाने प्राण सोडले. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी भोसले यास अटक केली आहे.
दरम्यान, धोंडीराम भोसले हा ज्या शाळेत मुख्याध्यापक आहे त्याच संस्थेचे मुलीचे आजोबा म्हणजेच धोंडीराम याचे वडील भगवान भोसले हे उपाध्यक्ष होते. शिवाय ते गावचे पोलीस पाटीलही होते. आता ते निवृत्त आहेत. इतकेच नव्हे तर मुलीची आई प्रीती भोसले या देखील गावच्या माजी सरपंच आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. त्यातील साधनाचा मृत्यू झाला.
(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2025 10:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

