Grandmother and Grandson | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Senior Citizen Abuse India: मुंबईतील (Mumbai Crime News) गोरेगावमधील आरे कॉलनीत (Aarey Colony Incident) शनिवारी पहाटे कॅन्सरग्रस्त (Cancer Patient Abandoned) वृद्ध महिलेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून (Elderly Woman Abandoned) दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस नियंत्रण कक्षाला या संदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या पडताळणीत कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका दुर्बल वृद्ध महिलेला खरोखरच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडून देण्यात आल्याचे आढळून आले. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, सदर महिलेस तिचा नातू या ढिगाऱ्यात सोडून आला. मुंई पोलीस (Mumbai Police Investigation) अधिक तपास करत आहेत.

महिला त्वचारोगाने पीडित

पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, 60 ते 70 वयोगटातील एक अशक्त वृद्ध महिला, गुलाबी नाईट ड्रेसमध्ये, प्लास्टिक आणि कुजलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आली. तिच्या चेहऱ्यावर व्रणयुक्त जखम होती, जी त्वचारोगातील कर्करोगाचे पुढील टप्पे असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गाल आणि नाकावर गंभीर संसर्ग दिसून येत होता. (हेही वाचा, Jalgaon Roadside Delivery: आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र, जळगावमध्ये महिलेचे रस्त्यावर बाळंतपण)

महिलेला रुग्णालय मिळण्यासाठी पोलिसांची आठ तास प्रतिक्षा

महिलेच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता, पोलिसांनी तिला जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटर आणि नंतर कूपर रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही ठिकाणी सुरुवातीला 'सुविधा उपलब्ध नाहीत' असे सांगत रुग्णालयांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर पोलिसांच्या सुमारे 8 तासांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर, संध्या 5:30 वाजता कूपर रुग्णालयात तिला दाखल करून घेण्यात आले.

CCTV फुटेज आधारे तपास

अत्यंत थकलेल्या आवाजात, महिलेने आपले नाव यशोदा गायकवाड (Yashoda Gaikwad) असल्याचे सांगितले. ती मालाड परिसरात राहते, असे तिने सांगितले आणि तिला तिच्याच नातवाने आरे कॉलनीत आणून तिथे टाकल्याचा आरोप केला. मिड डे टॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे. महिलेचा परिवार शोधण्यासाठी पोलिसांनी मालाड आणि कांदिवली येथील पत्त्यांवर भेट दिली, मात्र तिथे कोणीही तिची ओळख पटवू शकले नाही. यशोदा गायकवाड यांची छायाचित्रे सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पाठवण्यात आली आहेत, तसेच परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहे. सद्यस्थितीत पोलिसांना अद्याप कोणताही ठोस धागा मिळालेला नाही. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, महिलेच्या कुटुंबाचा शोध घेतला जात आहे. या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार आणि दुर्लक्ष या गंभीर मुद्यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झालं आहे.