Jalgaon Roadside Delivery: आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र, जळगावमध्ये महिलेचे रस्त्यावर बाळंतपण
जळगाव येथे एका 24 वर्षीय महिलेला रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला बाळंतपण करावे लागले, ज्यामुळे जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Maharashtra Rural Health Crisis: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका आदिवासी भागातील 24 वर्षीय संताबाई बरेला (Santabai Barela) या महिलेचे रस्त्यावर बाळंतपण (Jalgaon Roadside Delivery) झाले. विकासाच्या गप्पा मारणारा महाराष्ट्र आणि आरोग्य सेवा अद्ययावत केल्याचा दावा करणारे सरकार यांच्या धोरणातील फोलपणा पुन्हा एकदा या घटनेने उघडकीस आला आहे. रुग्णवाहीका (Ambulance Delay) वेळेत न पोहोचल्याने महिलेला कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय बाळंतकळा सहन कराव्या लागल्या. धक्कादायक म्हणजे पीडितेसोबत असलेल्या इतर महिलांनी प्रसंगावधान दाखवत वैजापूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून (PHC) अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर तिची प्रसुती रस्त्यावरच केली. आठवडाभरापूर्वी म्हणजेच 21 मे रोजी घडलेली ही घटना काहीशा विलंबाने प्रसारमाध्यमांतून पुढे आली आहे.
रुग्णवाहिकेचा अभाव; गर्भवती पत्नीसह पतीचा मोटरसायकलवरून प्रवास
संताबाई यांना 21 मे रोजी तीव्र प्रसववेदना जाणवत होत्या. नियोजित प्रसूती दिनांक 25 मे होता. मात्र, त्या दिवशी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्यांचा पती विश्वनाथ यांनी त्यांना मोटरसायकलवरून आरोग्य केंद्राकडे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, केंद्राजवळच असताना वेदना वाढल्यामुळे त्या रस्त्यावरच प्रसूत झाल्या. (हेही वाचा, Karnataka Shocker: प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी कापले बाळाचे गुप्तांग; नवजात मुलाचा मृत्यू, कुटुंबियांची कारवाईची मागणी)
दोन महिलांनी दिली मदत; व्हिडीओ व्हायरल
सामाजिक माध्यमांवर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये दोन महिलांनी संताबाई यांना मदत करताना दिसत आहे. त्या महिलांनी पांघरुण धरून काही प्रमाणात गोपनीयता राखत प्रसूती घडवून आणली. या दरम्यान, विश्वनाथ यांनी 30 मिनिटांहून अधिक वेळ मदतीची वाट पाहत असल्याचे सांगितले. (हेही वाचा, Nashik News: पाणीटंचाईमुळे अर्ध्यात थांबवली महिलेची प्रसूती; नाशिक येथील बिटको रुग्णालयातील घटना)
जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; काँग्रेस नेत्या शिंदेंचा आरोप
या घटनेवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रतिक्रिया देताना, 'प्रसवासाठी मदत करणाऱ्यामध्ये महिला एक अंगणवाडी कार्यकर्ती आणि प्रशिक्षित दाई होत्या,' असे सांगितले. त्याचबरोबर, 'स्थानिक नागरिकांनी त्वरित पीएचसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला माहिती दिली आणि नंतर तातडीने रुग्णवाहिका पाठवण्यात आली,' असेही ते म्हणाले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट
This is the condition of the citizens in our country.
A woman gives birth on the road side because there was no ambulance available...
This is not a story from a remote tribal village, it is from Jalgaon in Maharashtra. pic.twitter.com/8KxZ8AY5dU
— Anjali Damania (@anjali_damania) May 21, 2024
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे यांनी ही माहिती फेटाळली. 'रुग्णवाहिका वा कोणतीही मदत न मिळाल्यामुळे पतीने स्वतःच पत्नीला मोटरसायकलवरून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला,' असे त्यांनी सांगितले. तसेच, 'या घटनेमुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. तीन मंत्री असलेल्या जिल्ह्यात अशी घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.
'नवसंजीवनी' बैठकीत उघडकीस आली घटना
आदिवासी भागातील माता आणि बाल आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या ‘नव संजीवनी’ योजनेअंतर्गत झालेल्या बैठकीत ही घटना उघडकीस आली. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी घटनेच्या सर्व पैलूंची तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांच्यामार्फत सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 9370 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

