⚡Shaniwar Wada-Swargate Tunnel Road: पुणेकरांना दिलासा! शनिवारवाडा ते स्वारगेट या प्रस्तावित चारपदरी भुयारी मार्गाच्या प्रकल्पाला गती; केंद्र सरकारकडून सहकार्याचे आश्वासन
By Prashant Joshi
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात, विशेषतः शनिवार पेठ, कसबा पेठ, आणि स्वारगेट परिसरात, दररोज लाखो वाहनांमुळे शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर तीव्र वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो आणि पर्यावरणावर परिणाम होतो.