PBKS vs RCB, IPL 2024: आयपीएल 2024 चा 58 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs PBKS) यांच्यात होणार आहे. हा सामना धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत 11 सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी चार विजय नोंदवले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. मात्र आजच्या सामन्यात एक संघ बाद होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, विद्वत कवेरप्पा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)