DC vs MI, TATA IPL 2025 29th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 29 वा सामना आज म्हणजेच 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईने दिल्लीसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ दहा विकेट गमावून 193 धावा केल्या. या मोठ्या विजयानंतर मुंबईने सातव्या स्थानी झेप घेतली आहे. तर दिल्लीची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच गुजरात पहिल्या, बंगळुरु तिसऱ्या आणि लखनौ चौथ्या स्थानावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)