इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या (IPL 2023) हंगामाचा अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून दोन्ही संघांचा सामना सुरू होईल. त्याचबरोबर या सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कर्णधार म्हणून मैदानात उतरतील. दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीचा एक व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एमएस धोनीचे चाहते त्यांच्या कर्णधाराबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. ही आयपीएल एमएस धोनीची शेवटची आयपीएल असल्याचं काही चाहत्यांना वाटतंय. या व्हिडिओमध्ये चाहते एमएस धोनीबद्दल खूप भावूक दिसत आहेत.
Wholesome and full of Feels 🫶
Not just a Leader - an Emotion 🤗
Everyone is an 𝗠𝗦 𝗗𝗵𝗼𝗻𝗶 fan 😃#TATAIPL | #Final | #CSKvGT | @ChennaiIPL | @msdhoni pic.twitter.com/bUtdnEQX1s
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)