MI vs RCB: मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव (SuryKumar Yadav) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातून परतला होता. मात्र, त्याची बॅट चालली नाही आणि तो शून्यावर बाद झाला. अशाप्रकारे चाहत्यांना सूर्याची स्टाईल बघायला मिळाली नाही, पण आता आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याला त्याच्या स्टाईलमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद नबी यांच्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ज्युनियर नबी सूर्याच्या चेंडूवर धावा काढताना दिसत आहे. (हे देखील वाचा: MI vs RCB IPL 2024 Pitch Report: वानखेडे स्टेडियमवर कोणाला मिळणार मदत, गोलंदाज की फलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)