LSG vs DC TATA IPL 2025 Scorecard: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 चा 40 वा सामना 22 एप्रिल (मंगळवार) रोजी लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौकडून सर्वात जास्त झावा एडेन मार्करामने केल्या. त्याने 33 चेंडूत 52 धावांची जलद खेळी केली. त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मिचेल मार्शनेही 36 चेंडूत 45 धावांची खेळी केली. ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार होता. त्याच वेळी, आयुष बदोनीने पुन्हा एकदा प्रभावशाली खेळाडू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आणि 21 चेंडूत 36 धावा केल्या. तथापि, निकोलस पूरन (9) आणि अब्दुल समद (2) लवकर बाद झाल्याने डावाची गती मंदावली. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 4 षटकांत 33 धावा देत 4 बळी घेतले. मिचेल स्टार्क आणि दुष्मंथा चामीरा यांनीही 1-1 बळी घेतले.
लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सना दिले 160 धावांचे लक्ष्य
Innings Break!
Excellent comeback from the #DC pacers helps them restrict #LSG to 1️⃣5️⃣9️⃣
Who's taking away 2️⃣ important points tonight?
Updates ▶️ https://t.co/nqIO9mb8Bs#TATAIPL | #LSGvDC | @LucknowIPL | @DelhiCapitals pic.twitter.com/MVY74cXm8I
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)