इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 26 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आपले वर्चस्व कायम राखायचे आहे. या सामन्याच्या माध्यमातून दोन्ही संघ या मोसमातील आपापला सहावा सामना खेळत आहेत. राजस्थानने आतापर्यंत 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर लखनौने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 154 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्ससाठी सलामीवीर काइल मेयर्सने सर्वाधिक 51 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 155 धावा करायच्या आहेत.
Match 26. WICKET! 19.6: Yudhvir Singh 1(1) Run Out Shimron Hetmyer, Lucknow Super Giants 154/7 https://t.co/vqw8WrjNEb #TATAIPL #RRvLSG #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)