IPL 2022, MI vs GT: शानदार सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) रूपात पहिली विकेट गमावली आहे. राशिद खानच्या (Rashid Khan) फिरकीने मुंबईची 74 धावांची सलामी भागीदारी मोडली आणि रोहितला 43 धावांवर पॅव्हिलियनची वाट दाखवली. रोहितने आपल्या खेळीत 28 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकार व दोन षटकार मारले. पंचांनी प्रथम तो नाबाद घोषित केला, परंतु गुजरात टायटन्सने रिव्ह्यूच्या मदतीने पंचाचा निर्णय फिरवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)