MS Dhoni Runs Bhanuka Rajapaksa Out: एकदम भन्नाट! चित्त्यासारखी चपळता, अचूक निशाणा; धोनीच्या जबरदस्त थ्रोवर Bhanuka Rajapaksa रनआऊट (Watch Video)
MS Dhoni Runs Bhanuka Rajapaksa Out: क्रिस जॉर्डन याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भानुका राजपक्षे आणि शिखर धवन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसत होता. आणि राजपक्षे याला धावबाद होण्याचा फटका सहन करावा लागला. राजपक्षेने एकेरी धाव घेण्याच्या उद्देशाने शॉट खेळला पण जॉर्डनने शानदार थ्रो फेकला आणि धोनीने विकेटच्या मागून धावत येत हवेत उडी मारली आणि फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
- Read in
- मराठी
IPL 2022, CSK vs PBKS Match 11: एमएस धोनी (MS Dhoni) याने रविवारी, 3 एप्रिल रोजी त्यांच्या आयपीएल (IPL) 2022 च्या सामन्यात पंजाब किंग्जच्या भानुका राजपक्षेला (Bhanuka Rajapaksa) धावबाद केले. राजपक्षेने एक चोरटी धाव घेण्याच्या उद्देशाने चेंडू खेळला आणि धाव घेण्यासाठी धावला पण त्याचा साथीदार शिखर धवन याने रस दाखवला नाही आणि त्याला परत पाठवले. यादरम्यान ख्रिस जॉर्डनने (Chris Jordan) चेंडू धोनीकडे टाकला ज्याने शांतपणे धावत असलेल्या राजपक्षेला धावबाद केले.
Run out dhoni you beauty 😍#IPL2022 pic.twitter.com/bYwD0B97HC
— Cricket Gamee (@cricketgamee62) April 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2022 08:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

