Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आजपासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. भारताला पुढे अनेक कसोटी खेळायच्या आहेत. रोहित आणि कंपनी बांगलादेशला दणदणीत पराभव देण्यासाठी मैदानात उतरेल. दरम्यान, तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर मॅचचा सहज आनंद घेऊ शकता. हा कसोटी सामना वायाकॉम 18 नेटवर्क आणि दुरदर्शनवर प्रसारित केला जाईल. तुम्ही हा सामना स्पोर्ट्स 18 चॅनल 1 आणि चॅनल 2 वर पाहू शकता. तसेच हा सामना जिओ सिनेमा आणि  DD Sports, DD Free Dish वर पाहता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)