Rohit Sharma And Virat Kohli T20 Return: 1 जूनपासून टी-20 विश्वचषक 2024 सुरू (T20 World Cup 2024) होत आहे. वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिका (USA) यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यात एकूण 20 संघ सहभागी होत असून दरवेळेप्रमाणे 9 जून रोजी होणारा भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना चर्चेचा विषय ठरणार आहे. त्याआधी आणखी एक चर्चेचा विषय आहे आणि तो म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचे (Virat Kohli) टी-20 इंटरनॅशनलमध्ये पुनरागमन. दोन्ही खेळाडूंनी 10 नोव्हेंबर 2022 पासून एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आयसीसीने शुक्रवारी टी-20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचवेळी पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले. या पोस्टरमध्ये इतर संघांच्या कर्णधारांसह रोहित शर्माही दिसत होता. यानंतर आयसीसीने रोहितचा कर्णधार म्हणून विचार केल्याचे संकेत मिळत होते. तसेच नुकत्याच आलेल्या अहवालात हे स्पष्ट झाले होते की रोहित शर्मा कर्णधार म्हणून टी-20 मध्ये पुनरागमन करु शकतो. (हे देखील वाचा: INDW vs AUSW 1st T20 Highlights: पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा शानदार विजय, ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सनी केला पराभव)
Get ready for the ultimate cricket carnival in the West Indies and the USA 🥁
Unveiling the fixtures for the ICC Men’s T20 World Cup 2024 🗓️ 🤩#T20WorldCup | Details 👇
— ICC (@ICC) January 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)