IND Beat AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) महिला संघांमधील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 5 जानेवारी रोजी खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स (DY Patil Stadium) अकादमी, नवी मुंबई येथे झाला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा नऊ गडी राखून पराभव (IND Beat AUS) करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. याआधी टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला 19.2 षटकांत केवळ 141 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने सर्वाधिक 49 धावा केल्या. टीम इंडियाकडून तीतस साधूने सर्वाधिक 4 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने अवघ्या 17.4 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी शफाली वर्माने सर्वाधिक नाबाद 64 धावा केल्या. दोन्ही संघांमधला दुसरा सामना 7 जानेवारी रोजी डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे होणार आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 मालिकेसाठी अशी असू शकते Team India, 'या' खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)