Happy Birthday Shardul Thakur: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा(Shardul Thakur) आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)ने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत 'एक्स' हँडलवर खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. "शार्दुल ठाकूरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असे कॅप्शन लिहून बीसीसीआयने सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. शार्दुलने जेव्हाही भारतीय क्रिकेट संघाकडून (Team India)खेळला तेव्हा त्याने बॅट आणि बॉलने त्याचे सर्वोत्तम योगदान नेहमीच दिले आहे. ठाकूरला त्यांच्या चाहत्यांमध्ये ‘लॉर्ड’ म्हणूनही ओळखले जाते. सध्या तो संघाबाहेर आहे. तो लवकरच पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. (हेही वाचा: Mary Kom Criticize Indian Boxers: 'मी अजूनही त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करू शकते'; पॅरिसमधील भारतीय बॉक्सर्सच्या कामगिरीवर मेरी कोमची आगपाखड)
बीसीसीआयकडून पोस्टद्वारे शुभेच्छा
Here's wishing a Happy Birthday to Shardul Thakur 🎂👏#TeamIndia | @imShard pic.twitter.com/UHf2M8dmrX
— BCCI (@BCCI) October 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)