Photo Credit- X

Mary Kom Criticize Indian Boxers: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला मेरी कोम, बॉक्सिंगमधील वयोमर्यादेच्या नियमामुळे सध्या कोणत्याही बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. मेरी कोमचे() वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्याने. त्या वयाच्या कोणालाही स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी नाही. मात्र, पॅरिस ऑलिम्पिक 2024(Paris Olympics 2024) मधील भारतीय बॉक्सर्सची(Indian Boxers)खराब कामगिरी मेरी कोमला पचवता आली नसल्याचं समोर येत आहे.

मेरी कोमने तिच मत व्यक्त करताना म्हटले की, 'मला आतून वाईट वाटले, प्रगती झाली नाही. पॅरिस ऑलिम्पिक निराशाजनक होते. सर्व बॉक्सर बाद झाले. मला त्यांची कामगिरी खेदजनक वाटते. ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर्सना पाहून मी असा विचार करत राहिले की मी त्यांच्या जागी असते तर मी या खेळाडूंना मागे टाकले असते. पण वयोमर्यादेमुळे भाग घेऊ शकले नाही.' (हेही वाचा: Ashes 2025-26 Schedule Announced: ॲशेस 2025-26 चे वेळापत्रक जाहीर, ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर खेळवला जाणार 'डे-नाइट' कसोटी सामना)

इंडियन गेमिंग कन्व्हेन्शन (IGC) च्या एका कार्यक्रमादरम्यान, भाषणात मेरी म्हणाली, 'मी अजूनही प्रशिक्षण घेत आहे, मला माझ्या फिटनेसबद्दल काळजी वाटते. मला खात्री आहे की, एक-दोन फेऱ्यांमध्ये मला कोणीही हरवू शकणार नाही. ही भावना आहे. सध्याच्या बॉक्सर्समध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे आणि ते आपल्या सगळ्यांनाच पहायला मिळत आहे.

ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर्सची कामगिरी पाहून मला वेदना होत होत्या. फक्त बॉक्सिंगलाच वयोमर्यादा का आहे? मला अजूनही खेळण्याची भूक आहे, माझे स्वप्न आणि ऑलिम्पिक ध्येय अजूनही दुखत आहे. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले. तेव्हा भारताने बॉक्सिंगमध्ये पहिले पदक जिंकले. तर मेरी कोमने 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये महिलांच्या फ्लायवेटमध्ये कांस्यपदक मिळवले होते. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये लोव्हलिना बोर्गोहेने कांस्यपदक जिंकले होते.