इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (GT vs LSG) यांच्यातील संघर्ष दिवसाच्या पहिल्या सामन्यात सुरू आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 2 गडी गमावून 227 धावा केल्या होत्या. त्याचवेळी, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या डावात एक मजेदार दृश्य पाहायला मिळाले. वास्तविक, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचे खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर येताच एक मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. त्याचे असे झाले की, गुजरातचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा क्षेत्ररक्षण करताना उलटी पँट घालून मैदानावर आला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र सर्वांना याची माहिती मिळताच खेळाडूंनी तात्काळ पँट बदलण्यासाठी मैदानाबाहेर गेले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)