IND vs BAN 1st Test: चेतेश्वर पुजाराने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 19वे शतक पूर्ण केले आहे. त्याने 130 चेंडूत 102 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या खेळीत त्याने 13 चौकार मारले. पुजाराच्या शतकासह कर्णधार राहुलने भारताचा डाव घोषित केला. दुसऱ्या डावात भारताने 2 बाद 258 धावा केल्या. आता बांगलादेशसमोर विजयासाठी 513 धावांचे लक्ष्य आहे. सामन्याला दोन दिवसांहून अधिक दिवसांचा खेळ शिल्लक असताना भारताला विजयासाठी 10 विकेट्सची गरज आहे. त्याचबरोबर बांगलादेशला विजयासाठी 513 धावांची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)