
Stampede At Bhiwand: बागेश्वर (Bageshwar) धाम महाराज धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Dham Dhirendra Shastri) हे आज भिवंडी (Bhiwand) येथील माणकोली ब्लॉकजवळ असलेल्या इंडियन ऑईल कंपनीत सत्संगासाठी आले होते. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी लोकांसमोर कथा सांगितली. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या भक्तांना सांगितले की, मी तुम्हा सर्वांना विभूती देईन. तुम्ही सगळे एक एक करून या, आधी महिला येतील आणि मग पुरुष येतील. यानंतर, सर्व महिला आधी रांगेत उभ्या आणि पुरुष त्यांच्या मागे रांगेत उभे राहिले. काही वेळातच बाबांकडून विभूती घेण्यासाठी एवढा जमाव जमला की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्रथम विभूती मिळविण्यासाठी सर्वजण पुढे सरकू लागले.
विभूती घेण्यासाठी जमली गर्दी -
बागेश्वर बाबांकडून विभूती घेण्यासाठी गर्दी इतकी वाढली की, लोक एकमेकांना ढकलू लागले. ज्यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. शेजारी उभ्या असलेल्या बाऊन्सर्सनी लोकांना गर्दीतून बाहेर काढले. चेंगराचेंगरीमुळे घटनास्थळी आरडाओरडा झाला. तसेच अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ज्या महिलांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यांना एका बाजूला बसवण्यात आले. (हेही वाचा -Congress Oppose Dhirendra Shastri: बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला काँग्रेसचा विरोध, नाना पटोले यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र)
गर्दी हटवण्यासाठी पोलिसांनी केला सौम्य बळाचा वापर -
गर्दी मर्यादेपलीकडे वाढल्याचे पाहून धीरेंद्र शास्त्री आपल्या स्टेजवरून उठले. यानंतर गर्दीतील लोक एकापाठोपाठ एक स्टेजवर चढू लागले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी लोकांना हटवण्याचा प्रयत्न केला. सध्या या घटनेत कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा - Chhatrapati Sambhaji Nagar: बागेश्वर धाम दरबारात जमीर शेख कुटुंबीयांचे धर्मांतर, शास्त्रींच्या हस्ते दीक्षा, हिंदू धर्मात प्रवेश)
बागेश्वर बाबा पोहोचले संजय दत्तच्या घरी -
It was an honour and blessing to have Sri Dhiren Shashtriji Bageshwar Dham to visit my house and bless us all, Guruji and me are like family like brothers, Jai Bhole Nath pic.twitter.com/iaDkZAccnb
— Sanjay Dutt (@duttsanjay) January 4, 2025
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना संजय दत्तने लिहिले आहे की, 'आज श्री धीरेंद्र शास्त्री यांनी माझ्या घरी येऊन आम्हा सर्वांना आशीर्वाद दिले. हा आमच्यासाठी सन्मान आणि बहुमान आहे. गुरुजी आणि मी भावांसारखे कुटुंब आहोत, जय भोले नाथ!'