Photo Credit - Instagrm

शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'देवा'चा टीझर 5 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज यांनी केले असून सिद्धार्थ रॉय कपूर आणि उमेश केआर बन्सल यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत पूजा हेगडे आणि पावेल गुलाटी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'देवा' हा एक मोठ्या प्रमाणावर ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.  (हेही वाचा  - Kiara Advani Hospitalised: कियारा अडवाणी रुग्णालयात दाखल? 'गेम चेंजर'च्या प्रमोशनला अनुउपस्थित राहिली, आता टीमने दिलं स्पष्टीकरण)

टीझर रिलीजची घोषणा करताना तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर सांगितले की, हा चित्रपट 31 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओ आणि नेटफ्लिक्सद्वारे 'देवा' जगभरात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूरच्या या नव्या अवताराबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या चित्रपटाचा टीझर 5 जानेवारीला शाहिदच्या चाहत्यांना मोठे सरप्राईज देणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

 

'देवा' 31 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे आणि ॲक्शन-थ्रिलर प्रेमींसाठी एक मेजवानी असेल. शाहिद कपूरचा अतुलनीय अभिनय, स्फोटक ॲक्शन आणि रंजक कथा यामुळे देवा हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरू शकतो.