Photo Credit- X

Israel-Gaza War: इस्रायलने पुन्हा एकदा गाझाला लक्ष्य (Gaza Airstrike) केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली लढाऊ विमानांनी गाझा पट्टीवर हल्ला (Israel Gaza War) केला. त्यात 30 पॅलेस्टिनी ठार झाले. यासोबतच इस्रायली लष्कराने उत्तर गाझा येथील हॉस्पिटलवर बॉम्बफेक करण्याचा इशारा दिला आहे. गाझा सिव्हिल डिफेन्सने एक निवेदन जारी केले ज्यात म्हटले की, गाझा शहराच्या पूर्वेकडील अल-सय्यद अली भागात शुक्रवारी हवाई हल्ले करण्यात आले. (Israel Gaza War: इस्रायली सैन्याचा रफाहवर हल्ला, 20 जण ठार)

ज्यात चार मुले आणि एका महिलेसह सात जण ठार झाले. सिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, यापूर्वी गाझा शहराच्या पश्चिमेकडील अल-शिफा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या हवाई हल्ल्यात पाच जण ठार झाले होते तर काही जण जखमी झाले होते. गाझातील अल-अहली अरब रुग्णालयाने पुष्टी केली की गाझा शहराच्या पश्चिमेकडील अल-नसर स्ट्रीटवर हवाई हल्ल्यात ठार झालेल्या पाच लोकांचे मृतदेह मिळाले.

वैद्यकीय पथकांनी अल-जैतौन आणि अल-साबरा भागात हवाई हल्ल्यांनंतर तीन मुलांसह आणखी पाच मृतदेह बाहेर काढले. याशिवाय मध्य गाझामध्ये अल-जाविदा शहरात नागरिकांच्या कारवर हल्ला झाला. त्यात दोन जण ठार झाले. इस्रायली सैन्याकडून गाझाला बॉम्बफेक करण्याचा इशारा मिळाला आहे. इस्रायल आणि गाझामधील हल्ले हे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत.

7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायल भागात हमासने केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर गाझामध्ये इस्रायलने केलेल्या लष्करी कारवाईचा एक भाग आहे. ज्यामध्ये सुमारे 1,200 लोक मारले गेले आणि 250 जणांना ओलिस ठेवले गेले. गाझामधील वैद्याकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, गाझामध्ये चालू असलेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 45,658 वर पोहोचली आहे आणि 108,583 लोक जखमी झाले आहेत.