ISRO Grows Cowpea Seeds in Space (फोटो सौजन्य - X/@isro)

ISRO Grows Cowpea Seeds in Space: इस्रो (ISRO) ने आता आणखी एक चमत्कार केला आहे. अंतराळात जीवसृष्टीचा शोध घेणाऱ्या वैज्ञानिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रोने अवकाशात चवळीच्या बिया (Cowpea Seeds) उगवल्या आहेत. इस्त्रोला आशा आहे की, लवकरचं चवळीच्या बिया अकुंरीत होऊन पाने देखील निघतील. या चवळीच्या बिया 30 डिसेंबर रोजी पीएसएलव्ही सी 60 रॉकेटद्वारे स्पेड एक्ससह पाठवण्यात आल्या होत्या. या प्रयोगाद्वारे, शास्त्रज्ञांना अंतराळात वनस्पती कशा वाढवता येतील हे समजू शकणार आहे, ज्यामुळे अंतराळातील दीर्घ कार्यात मदत होणार आहे.

इस्त्रोने अंतराळात उगवल्या चवळीच्या बिया -

बियाण्यांमधून लवकर पाने निघतील, अशी अपेक्षा इस्रोने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. इस्रोने लिहिले आहे की, अंतराळात जीवनाची सुरुवात! PSLV-C60 POEM-4 वर VSSC चा CROPS (कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज) प्रयोग यशस्वीरित्या पार पडला. चवळीचे बियाणे चार दिवसांत उगवले, लवकरचं पाने येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, SpaceX सोबत संशोधन आणि विकासाशी संबंधित 24 पेलोड देखील पाठवण्यात आले आहेत. (हेही वाचा - ISRO ने पुन्हा रचला इतिहास, Spadex लॉन्च करणारा बनला चौथा देश,चांद्रयान 4 साठी का आवश्यक आहे ते जाणून घ्या)

काय आहे SpaDeX मिशन?

इस्रोने SpaDeX मिशन अंतर्गत 229 टन वजनाच्या PSLV रॉकेटसह दोन छोटे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. हे उपग्रह 470 किलोमीटर उंचीवर डॉकिंग आणि अनडॉकिंग करतील. इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेच्या यशामुळे चांद्रयान-4, स्वतःचे अंतराळ स्थानक आणि चंद्रावर भारतीय प्रवासी पाय ठेवण्यासारख्या आगामी मोहिमांची भारताची स्वप्ने साकार होतील. (हेही वाचा - Voice Calls via Smartphone From Space: आता पहिल्यांदाच अंतराळातून मोबाईल कॉल करता येणार; ISRO अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित करून रचणार इतिहास)

इस्रोने अंतराळात उगवल्या चवळीच्या बिया - 

विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने विकसित केलेल्या 'कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज' (CROPS) प्रयोगाने सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. PSLV-C60 मिशनच्या POEM-4 प्लॅटफॉर्मवर हा प्रयोग सुरू करण्यात आला असून अवघ्या 4 दिवसांत चवळीच्या बियांची यशस्वीपणे उगवण झाली आहे. CROPS चे उद्दिष्ट अंतराळात झाडे कशी वाढतात हे समजून घेणे आहे.

चवळीच्या 8 बिया उगवल्या -

या प्रयोगात चवळीच्या 8 बिया नियंत्रित वातावरणात उगवल्या गेल्या आहेत, ज्यात सक्रिय थर्मल कंट्रोल आहे. या अंतर्गत, अंतराळ प्रवासादरम्यान वनस्पतींना कोणत्या परिस्थितीतून जावे लागते याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे यश भारताच्या अंतराळ जीवशास्त्र संशोधनातील एक मोठा मैलाचा दगड आहे.