Kenya Metal Ring: केनियातील (Kenya) माकुएनी काउंटीमधील (Makueni County) मुकुकू गावात (Mukuku Village) 30 डिसेंबर रोजी 500 किलो वजनाची धातूची रिंग कोसळली, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंदाजे 2.5 मीटर व्यासाची ही धातूची वस्तू रॉकेट प्रक्षेपणापासून विभक्त रिंग असल्याचे मानले जात आहे. केनिया स्पेस एजन्सी (KSA) आणि स्थानिक प्राधिकरण ऑब्जेक्टचा प्रभाव आणि उत्पत्ती तपासत आहेत. प्राथमिक निष्कर्षानुसार ही रिंग प्रक्षेपण वाहनापासून वेगळी झाली असून ती पृथ्वीवर पडल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

केनियामधील गावात आकाशातून पडली 500 किलो रहस्यमय धातूची रिंग -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)