Law gavel lights प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Nanded Bomb Blast Case: नांदेड येथे 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात (Nanded Bomb Blast Case) सर्व नऊ जिवंत आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कनिष्ठ न्यायालयाने तब्बल 18 वर्षांनंतर या प्रकरणी निकाल दिला आहे. बचाव पक्षाच्या वकिलाने सांगितले की, ही घटना बॉम्बस्फोट असल्याचे फिर्यादी पक्ष सिद्ध करू शकले नाही. या प्रकरणातील एकूण 12 आरोपींपैकी दोघांचा स्फोटात मृत्यू झाला, तर एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीव्ही मराठे यांनी शनिवारी उर्वरित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 4 आणि 5 एप्रिल 2006 च्या मध्यरात्री नांदेडमध्ये एका RSS कार्यकर्त्याच्या घरी स्फोट झाला होता.

फिर्यादी पक्ष हा बॉम्बस्फोट असल्याचे सिद्ध करू शकला नाही -

लक्ष्मण राजकोंडवार, असे या संघ कार्यकर्त्याचे नाव आहे. राजकोंडवार यांचा मुलगा नरेश राजकोंडवार आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हिमांशू पानसे यांचा स्फोटक यंत्र तयार करताना मृत्यू झाल्याचा दावा तपासकर्त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केला होता. नंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपवण्यात आले. बचाव पक्षाचे वकील नितीन रुणवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, खटल्यादरम्यान फिर्यादी पक्षाच्या 49 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. मात्र ही घटना 'बॉम्बस्फोट' असल्याचे फिर्यादी पक्ष न्यायालयात सिद्ध करू शकले नाही. (हेही वाचा -Bomb Threat at Shaniwar Wada: पुण्यातील शनिवाडा मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या कॉलने खळबळ; बॉम्बस्कॉड कडून शोधकार्य सुरू)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला बॉम्बस्फोटोची धमकी -

नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयालाही अनेकदा बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. 2022 मध्ये अज्ञात व्यक्तीने फोन करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. बॉम्बस्फोटाची धमकी मिळताचं घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक पाठवण्यात आले होते. मात्र, याठिकाणी काहीही संशयास्पद आढळले नाही. खबरदारी म्हणून गस्त वाढवण्यात आली होती. संघ मुख्यालयात सुरक्षेसाठी सीआरपीएफची तुकडी तैनात आहे.