Army Vehicle Falls Into Gorge In J&K's Bandipora (फोटो सौजन्य - ANI)

Army Vehicle Falls Into Gorge In J&K's Bandipora: जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात (Bandipora District) शनिवारी लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून वुलर व्ह्यूपॉईंटजवळ खोल दरीत कोसळले. या अपघातात किमान दोन सैनिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बांदीपोरा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसरत इकबाल वानी यांनी एएनआयला सांगितले की, रुग्णालयात 5 जखमींना आणण्यात आले होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला होता. 3 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे.

पूंछ जिल्ह्यातील अपघातात 5 जवानांचा मृत्यू -

मंगळवारी संध्याकाळी पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) वाहन रस्त्यावरून घसरल्याने पाच सैनिकांचा मृत्यू झाला होता. तसेच चालकासह पाच जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेच्या अवघ्या आठवड्यानंतर ही घटना घडली आहे. हे वाहन पूंछजवळ रस्त्यावरून नाल्यात कोसळले. (हेही वाचा - Army Truck Fall into Valley in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये आर्मी ट्रक दरीत कोसळल्याने 3 सैनिकांचा मृत्यू, 4 जखमी)

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले - 

काश्मीरमध्ये दाट धुक्याची चादर -

गेल्या महिन्यापासून खोऱ्यात थंडीची लाट पसरली आहे, शनिवारी काश्मीरच्या काही भागांना धुक्याच्या दाट थराने वेढले आहे. हवामान अधिकाऱ्यांनी सांगितले की, खोऱ्याच्या मधल्या आणि वरच्या भागात जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, हवामान खात्याने शनिवारसाठी 'यलो' अलर्ट आणि रविवारी जोरदार बर्फाचा इशारा देऊन 'ऑरेंज' अलर्ट जारी केला. तथापी, विशेषत: रविवारी हवाई वाहतुकीत तात्पुरता व्यत्यय येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.