MI vs CSK, IPL 2024: आज (14 एप्रिल, रविवार) आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात  रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रविवारी दुहेरी हेडरचा हा दुसरा सामना असेल. हा सामना पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. सामना साडेसात वाजता सुरू होईल. या सामन्यात रोहित शर्मा आणि एमएस धोनी आमनेसामने असतील. या मोसमातील हा 29 वा सामना आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असेल. एकीकडे मुंबई इंडियन्सला गतविजेत्या चेन्नईचा पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक साधायची आहे. दुसरीकडे, चेन्नईला मोसमातील चौथा विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आणायचे आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा आणि चेन्नई सुपर किंग्ज सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)