Virat Kohli Return To India: आयपीएल 2024 पूर्वी (IPL 2024) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. आरसीबीचा हा अनुभवी खेळाडू 2 महिन्यांनंतर भारतात परतला आहे. यामुळे आरसीबी चाहत्यांच्या आनंदाला सीमा नाही. आरसीबीचे सर्व मोठे खेळाडू एकापाठोपाठ एक संघात सामील होत होते, पण विराट कोहलीबाबत (Virat Kohli) काहीही अपडेट नव्हते. आता किंग कोहली लंडनहून भारतात परतला आहे. आता तो एक-दोन दिवसांत आरसीबीमध्ये सामील होऊ शकतो. आरसीबीच्या चाहत्यांसाठी यापेक्षा चांगली बातमी असू शकत नाही. (हे देखील वाचा: DC vs RCB WPL 2024 Final Live Streaming: आज मिळणार नवा विजेता! दिल्ली आणि आरसीबीमध्ये टक्कर; येथे सामना पाहा थेट लाइव्ह)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)